बुद्धिबळातील चेकमेट स्ट्रॅटेजीचा उपयोग बाल स्पर्धकांसाठी जीवनात उपयोगी
राज्यस्तरिय बुद्धिबळ चाचणी स्पर्धेची मानकरी ठरली संस्कृती वानखडे तथा आयुष महाजन
वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला- बुद्धिबळातील चेकमेट हा परवलीचा शब्द बाल विद्यार्थी व स्पर्धकांसाठी जीवनात अत्यंत महत्त्वाचा असून बुद्धिबळमुळे बुद्धी तल्लख व ऊर्जावान होते. मैदानी खेळा समवेत अशा खेळांचा ही सातत्याने ग्रामीण व्यवस्थेत उपयोग वाढला पाहिजे व ग्रामीण भागातील स्पर्धकांनी अशा उपक्रमात सहभागी घेऊन आपल्या बुद्धीला वाव दिला पाहीजे यासाठी बाजार समितीचा हा उपक्रम प्रशंसनीय असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
कृषी उत्पन्न बाजार समिती व महानगर बुद्धिबळ असो च्या संयुक्त विद्यमाने बाजार समितीच्या गायवाडा सभागृहात लोकनेते स्व वसंतराव धोत्रे यांच्या जयंती निमित्त गत चार दिवसापासून सुरू असलेल्या राज्यस्तरिय बुद्धिबळ स्पर्धेचा सोमवारी मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरणाने समारोप करण्यात आला.आ.अमोल मिटकरी यांच्या अध्यक्षतेत संपन्न या पारितोषिक वितरण व समारोपीय सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते डॉ संतोष कुमार कोरपे,डॉ सुभाषचंद्र कोरपे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, महाराष्ट्र चेस असो चे कोषाध्यक्ष हाजी फारुक शेख, जिल्हा उपनिबंधक विनायकराव काळे, बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे, महानगर चेस असो चे अध्यक्ष संदीप पुंडकर,बाजार समितीचे उपसभापती निळकंठराव खेडकर,असो चे सचिव जितेंद्र अग्रवाल,व्यापारी मंडळाचे अध्यक्ष चंद्रशेखर खेडकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.दीप प्रज्वलनाने या समारोपीय सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला.यावेळी स्पर्धेचे मुख्य परीक्षक प्रवीण ठाकरे यांनी चार दिवसापासून सहभागी असणाऱ्या स्पर्धक विजेत्यांच्या नावाची घोषणा केली.16 वर्षाखालील वयोगटात संपन्न झालेल्या या चाचणी स्पर्धेत 1576 अंक प्राप्त करून संस्कृती वानखडे या अकोल्यातील स्पर्धक मुलीने प्रथम क्रमांक तर मुलांमध्ये 1740 अंक प्राप्त करणारा कोल्हापूर येथील आयुष महाजन याने प्रथम क्रमांक प्राप्त केला. दोन्ही विजेत्यांना तीन हजार रुपये रोख व ट्रॉफी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.यात सर्वोच्च अंक प्राप्त करणाऱ्या मुलींमधील पहिल्या दहा धनश्री खैरमोडे पुणे,देवांशी सोळंकी पालघर,श्रद्धा बजाज नागपुर, गौरी स्वारसत ठाणे, वेदिका पाल नागपुर, अनाईशा नाहर मुंबई,देवांशी गावंडे अकोला, सिया कुलकर्णी नाशिक, लावण्या काष्टी चंद्रपूर यांना रोख पसरितोषिक, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह ने सन्मानित करण्यात आले. मुलांमधून पहिले दहा आलेले कुशाग्र जैन पुणे,सक्षम सिंग नागपुर,अरविंद आयर ठाणे,अक्षय बोरगावकर पुणे, भूमीनाथन ललितादितायणार पुणे,निलय कुलकर्णी नागपूर,श्लोक चांदराणी अकोला, शिवराज पिंगळे पुणे,आकाश मागाई सोलापूर आदींना यावेळी रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. या पारितोषिक वितरण कार्यक्रमात दहा वर्षातील, आठ वर्षाखालील बाल स्पर्धकांना ही विविध पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करीत विजेत्यांना आपल्या शुभेच्छा बहाल केल्यात.तर पराभूत झालेल्या स्पर्धकांनी नव्या जोम व नव्या उमेदीने पूर्ण तयारी करून अशा स्पर्धात सहभाग घेण्याचे आवाहन केले. यावेळी पालकांच्या वतीने जयंत पिंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त करीत अशा अभिनव स्पर्धेचे कौतुक केले.यावेळी या आयोजनात सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला.माहेश्वरी भवन उपलब्ध करून दिल्याबद्दल माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष व बाजार समितीचे संचालक रमेशचंद्र चांडक यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.तसेचआरबीटेटर प्रविण ठाकरे,जलगाव,विवेक सोहनी,रत्नागिरी, विकास भावे बदलापुर,जयश्री डागचे ठाणे,अमित कदम अलीबाग, श्रेयस पाटील अलीबाग यांना ही सन्मानित करण्यात आले.आपल्या समारोपीय मनोगतात शिरीष धोत्रे यांनी या उपक्रमाची माहिती देत पहिल्याच अशा उपक्रमाला राज्यभरातील स्पर्धकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे नव्या उमेदीने बाजार समिती अशा उपक्रमात सातत्याने सहभागी होणार असल्याचे सांगून उपस्थितांचे आभार मानले. संचालन प्रा मोहन खडसे तथा व्यापारी मंडळाचे अध्यक्ष चंद्रशेखर खेडकर यांनी, स्पर्धा संचालन मुख्य पंच प्रवीण ठाकरे यांनी, तर आभार प्रदर्शन उपसभापती निळकंठ खेडकर यांनी मानलेत.यावेळी प्रभूजितसिंह बचेर,बाजार समिती संचालक प्रकाशराव काले,सुनील परनाटे,गजाननराव पुंडकर,रमेशचंद्र चांडक,सुरेश सोळंके,ज्ञानेश्वर महल्ले,अभिमन्यू वकटे,मुकेश मुरूमकार,चंद्रशेखर खेडकर,सौ.रश्मीताई अवचार,बाबुराव गावंडे, विठ्ठलराव चतरकर,सौ विद्याताई गावंडे,प्रमोद लाखे,सुनील मालोकर,राजेश बेले,देवेंद्र देवर, सौ.वर्षाताई गावंडे,चंदू चौधरी समवेत बाजार समिती चे अधिकारी,कर्मचारी,स्पर्धक एवं महिला पुरुष पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





