अकोल्यात किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन

0
247

मान्यवरांच्या हस्ते आज पार पडला भूमिपूजन सोहळा
७ मार्च रोजी महाराज करणार सामाजिक प्रबोधन
वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क 

अकोला :आपल्या अमोघ वाणीने महाराष्ट्रासह अख्या देशाच्या नागरिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे प्रसिध्द समाज प्रबोधनकार,विनोदाचार्य हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे महानगरात सोमवार, ७ मार्च रोजी सायं. ६.३० वाजता भव्य किर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.या किर्तनाच्या नियोजित जागेचा सोमवारी मान्यवरांच्या हस्ते कौलखेड येथे भूमिपूजन सोहळा मोठ्या थाटात पार पडला. कौलखेड येथील आदिशक्ती मुक्ताई मंडळाचा हा उपक्रम असून,गत तीस वर्षापासून ही ज्ञान ज्योत अखंडपणे सुरु आहे.या भूमिपूजन सोहळ्यात माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे,आ.अमोल मिटकरी,हभप नानासाहेब उजवणे,आदिशक्ती मुक्ताई मंडळाचे अध्यक्ष बाळाभाऊ गावंडे,हभप मनोहर महाराज डुकरे, हभप वासुदेवराव महल्ले,सचिव साहेबराव वहिले, श्रीकांत पिसे,हरीभाऊ भालतिलक,बादलसिंग ठाकूर उपस्थित होते.यावेळी मान्यवरांचे स्वागत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा कीर्तन महोत्सवाचे स्वागताध्यक्ष संग्राम गावंडे यांनी केले.दरवर्षी आदिशक्ती मुक्ताई मंडळाव्दारे जानेवारी महिन्यात किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते.मात्र कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्षापासून त्यात खंड पडला होता. यंदा महाराष्ट्रातील ख्यातनाम किर्तन व समाज प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या हरिकिर्तनाचा कार्यक्रम सोमवार दि ७ मार्च रोजी दुर्गा लॉनच्या बाजूला,एसटी वर्कशॉपच्या समोर,कौलखेड येथे आयोजित करण्यात आला असून याचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. संचालन खानझोडे यांनी, प्रास्ताविक हभप मनोहर महाराज डुकरे यांनी तर आभार प्रदर्शन माजी नगरसेवक पंकज गावंडे यांनी मानलेत.
किर्तनाची भव्य जय्यत तयारी
कौलखेड येथे होत असलेल्या समाज प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या किर्तनाची भव्य जय्यत तयारी आदिशक्ती मुक्ताई मंडळाव्दारे करण्यात येत आहे.याकरिता ५ एकरावरील क्षेत्राचे भव्य प्रांगण तयार करण्यात येत आहे. सदर किर्तन महोत्सव म्हणजे पश्चिम विदर्भासाठी पर्वणी असून, महिलांसाठी विशेष आसन व्यवस्थेचे नियोजन केले जाणार आहे.
खेळ पैठणीचाही कार्यक्रम
मंगळवार, ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पुणे येथील कॉमेडिचा बादशाह,अभिनेता सुभाष यादव यांचा खळखळून हसविणारा कॉमेडिचा भन्नाट कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याशिवाय विविध क्षेत्रातील कर्तबगार महिला भगिणींचा गौरव करण्यात येत आहे.

Previous articleराज्यस्तरीय बुद्धिबळ चाचणी स्पर्धेचा शानदार समारोप
Next articleजवसाची समूह पद्धतीने शेती करणे गरजेचे- डॉ. राजेंद्र गाडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here