चांदापूर येथे शिवजयंती उत्साहात साजरी 

0
358

चांदापूर येथे शिवगर्जना सांस्कृतिक व बहुउद्देशीय संस्थेच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्य दोन दिवसीय जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. यात दिनांक १८ फेब्रुवारीला इयत्ता दुसरी व तिसरीच्या विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली जयंती चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांचा एक गट व इयत्ता सहावी व सातवीचा एक गट अश्या दोन गटात सामान्यज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली. त्याचप्रमाणे दिनांक १९ फेब्रुवारीला गट अ , गट ब, व गट क अशा तीन गटात वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली . व सोबत Kahoot Quiz अंतर्गत ऑनलाईन सामान्यज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली .

सायंकाळी ठिक ५:०० वाजता संपूर्ण गावकऱ्यांतर्फे भव्यदिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले . सायंकाळी ठिक ८:०० वाजता सत्कारमूर्तींचा सत्कार व सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये शिवगर्जना सांस्कृतिक व बहुउद्देशीय संस्था चांदापूर व संपूर्ण ग्रामस्यांच्या सौजन्याने मूल तालुक्यातील पहिले व्हिडिओ पत्रकार, मूल लाईव्ह चे संपादक अमित राऊत तसेच मुल तालुक्यातील पहिला महिला पत्रकार तथा मूल दर्पन च्या संपादिका , गायिका कुमुदिनी भोयर व झाडीबोली साहित्य मंडळाचे सचिव व कविवर्य लक्ष्मण खोब्रागडे यांचा मानवस्त्र सन्मानचिन्ह व पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर चित्रकला , सामान्यज्ञान, वक्तृत्व स्पर्धा व kahoot Quiz मधील प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व पुस्तक देऊन गौरविण्यात आले .

या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून चांदापूरच्या सरपंच सोनी देशमुख, अध्यक्ष अनिल नैताम मुख्याध्यापक , सत्कारमूर्ती अनित राऊत, कुमुदिनी भोयर, लक्ष्मण खोब्रागडे तर प्रमुख अतिथी अतुल तिवाडे, गणपतराव पा. पाल , विनायकराव झरकर, खुशालराव पा . शेरकी, वेणू चिंचोलकर, सुनिता कडूकार, वंदनाकोरेवार, मंडळाचे अध्यक्ष दिलीप पाल, रविभाऊ शेरकी, ताराचंदजी शेडमाके, नवनित चिंचोलकर , सुरेश जिल्हेवार सर, रुपेश परसवार सर, सिंधूताई नैताम मॅडम श्री. कैलास कोसरे सर ,सुरेश देशमुख, पंकज निशाने , वामन नागापूरे आदी मान्यवर उपस्थित होते .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंत पोटे , धिरज पाल यांनी तर प्रास्ताविक नंदकिशोर शेरकी यांनी केले . व आभार प्रदर्शन अंकुश शेरकी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे सदस्य मनोज शेरकी, धर्मेंद्र घोगरे, ठकसेन मिसार , बंडू पोरटे, अभिजित चिंचोलकर, दिलीप पोटे, एश्वित शेरकी, कमलेश चुदरी व अन्य सदस्य त्याचप्रमाणें गुरुदेव सेवा मंडळाचे सदस्य, तुकाराम महाराज प्रतिष्ठानचे सदस्य, म. जोतीबा फुले मंडळाचे सदस्य व संपूर्ण गावकऱ्यांनी सहकार्य केले .

Previous articleमातंग समाज तर्फे संत रोहिदास उर्फ रविदास जयंती साजरी
Next articleशिवटेकडी मुल येथे भव्य महाशिवरात्री उत्सव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here