मूल:-नगरपरिषद मूल येथील रोजंदारी तत्त्वावर किंवा स्थायी पदावर काम केलेले सफाई कामगारांना लाड पांगे समितीच्या अनुषंगाने तसेच अनुकंपा तत्वावर वारसा हक्क प्राप्त होण्यास पात्र वारसदारांना नियुक्ती मिळण्यास पालिका प्रशासन अधिकारी चंद्रपूर डॉ. विद्या गायकवाड यांच्या सोबत अखिल भारतीय सफाई मजदूर काँ. स्वतंत्र कामगार संघटना रजि.7262 महाराष्ट्र प्रदेश चे विभागीय अध्यक्ष मा.छगन महातो यांची काल दि. 22/05/2025 बैठकीत सकारात्मक चर्चा झाली .
चर्चेमध्ये स्थाई सफाई कामगार या पदावरून रिक्त झालेले सफाई कामगारांच्या वारसदारांना लाड पागे समितीच्या शिफारशी नुसार तसेच शासनाने मान्य केलेल्या अटी शर्तीनुसार त्यांची नियुक्ती होणे आवश्यक आहे . यात कोणत्याही प्रकारे प्रशासनाची चुकी होऊ नये याची दक्षता घेणे लाड पागे समिती तसेच अनुकंप हे दोन वेगवेगळे विषयावर अवलोकन करिता न्याय देणे तसेच रोजंदारी तत्त्वावर कार्यरत असलेल्या सफाई कामगाराना मा. उच्च न्यायालय यांच्या आदेशान्वये नियमित केलेले सफाई कामगारांना नगर विभागाच्या शासन निर्णय 13 ऑक्टोबर 2024 अन्वये मंजूर स्थायी पदावर नियमित करण्यात आलेल्या सफाई कामगारांचे व्यापंगत पद मंजूर होण्यास, तसेच विहित मुदतीत अर्ज सादर न केलेले पात्र अर्जदारांना क्षमापित व पद मंजुरीसाठी पाठवण्याची कारवाई करावी तसेच महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष राज्यमंत्री शेरसिंग डागोर यांचे नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर नियोजन भवन आयोजित 9 मे 2025 रोजी बैठकीत दिलेल्या आदेशान्वे सफाई कामगारांचे प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवून न्याय द्यावे. तसेच प्रत्येक नगरपरिषदेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेची अंमलबजावणी संदर्भात सक्तीचे आदेश व पत्र देण्यात यावे.
नगरपरिषद मुल येथिल पात्र वारसदारांना न्याय मिळण्यास तात्काळ कारवाई केली जाईल नियमानुसार पात्र वारसदारांना नक्कीच न्याय मिळेल तसेच प्रशासन तत्पर आहे व याच्यावर अमलबजावणी तात्काळ होईल अशे आश्वासन डॉ. विद्या गायकवाड संयुक्त पालिका प्रशासन अधिकारी चंद्रपूर यांनी संघटनेला दिले .