मूल नगरातील अनेक वार्डातील महत्वाच्या समस्याचे मुख्याधिकारी यांना तालुका काँग्रेसचे निवेदन समस्या निकाली न काढल्यास नगर परिषदेसमोर धरणे आंदोलन

0
111

मूल :- मूल नगर परिषदेच्या प्रशासकीय राजवटीत नगरातील अनेक समस्या कित्तेक दिवसापासून प्रलंबित आहेत. कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे येत्या पावसाळ्यात असलेल्या समस्यांचा नागरीकांना खूप त्रास सहन करावा लागणार आहे. करीता मुल तालुका काँग्रेस कमिटीने दिनांक १९ जून २०२५ रोजी काँग्रेस नेते, माजी जी.प.अध्यक्ष व सी.डी.सी.सी. बँकेचे अध्यक्ष संतोषशिंह रावत यांच्या नेतृत्वात बैठक घेऊन नगरातील अनेक वार्डातील महत्वाच्या समस्या जाणून घेतल्या असून २० जून २०२५ रोजी मुख्याधिकारी नगर परिषद मुल यांना तालुका काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले. येत्या आठ दिवसात समस्यांचे निरसन केल्या गेले नाही तर न.प. समोर नागरिकांना घेऊन धरणे आंदोलन करण्यांत येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.

नागरीकांनी केलेल्या खालील समस्यांच्या मागण्या

१) वार्ड नंबर १५ मधिल चरखासंघ परिसर पुर्वेस असलेल्या श्री. अविनाश गरपल्लीवार यांचे घराकडून सौ. शामला विनायक बेलसरे घरासमोरुन येणारा रस्ता दुरस्त करुन देण्याबाबत.

२) पाऊसाळया पुर्वी नगरातील खुल्या नाल्या साफ करावे व फवारणी करावे.

३) वार्ड नं.१७ श्री. संदिप मोहबे यांच्या वार्डात इलेक्ट्रीक खंबा जिर्ण झाला आहे. खाली तार वाकले आहेत. त्वरीत नविन लावावे, त्याच वार्डात रोड उंच व घरे खाली रोडच्या साईडला गटटू लावावे सौ. भुमिका मडावी यांची मागणी आहे.

४) रोडच्या बोजुचे झाडे त्वरीत तोडावे. खाली असलेले प्लॉट धारकांचे प्लॉट स्वच्छ करुन घ्यावे.

५) पाणी पुरवठा नियमित होत नसल्याने खाजगी सार्वजनिक विहीरीमध्ये ब्लीचींग पाऊडर टाकावे.

६) नाली चेंबरवरील झाकन तुटलेले आहेत. ते त्वरीत बदलवून घ्यावे, जेणे करुन घान येणार नाही.

७) अनेक वार्डात व मुख्य रस्त्यावरील रोडच्या साईडचे गट्टू खाली दबल्यामुळे दुचाकी वाहण चालकांचे अनेक अपघात झाले आहेत. ते त्वरीत दुरस्त करावे. नागरीकांची मागणी.

  1. ८) मुख्य रस्त्यावरील डिव्हॉयडर तुटून रोडवर पडलेले आहेत. ते उचलावे.

९) संपूर्ण नगरातच गावटी ड्रंकरांचा हैदोस आहे. डूकरांना गावाबाहेल हाकलून त्वरीत बंदोबस्त करावे.

नागरीकांनी वरील प्रमाणे केलेल्या मागण्या आपण लक्ष घालून १० दिवसात पुर्ण करावे, अन्यथा नगर परिषदेसमोर धरणे आंदोलन पुकारण्यात येईल याची नोंद घ्यावी.

वरील समस्यांचे निवेदन मुख्याधिकारी यांचे न.प.कार्यालय प्रमुख विनोद येनूरकर यांचेकडे देण्यात आले आहे. याप्रसंगी तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, माजी जी.प. सदस्या मंगला आत्राम, माजी नगर सेविका ललिता फुलझेले, माजी नगर सेवक बाबा असीम, महिला शहर अध्यक्षा नलिनी आडपवार, युवक काँग्रेस अध्यक्ष पवन नीलमवार,शहर महासचिव कैलास चलाख, शहर उपाध्यक्ष संदीप मोहबे, उपाध्यक्ष सुरेश फुलझेले, महिला सचिव शामला बेलसरे, काँग्रेस पदाधिकारी डेव्हिड खोब्रागडे, भूमिका मडावी, मंगला कुलसंगे, कृष्णा बोरेवार, आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleअपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी; डिव्हायडरला धडकल्याची माहिती 
Next articleमानधन वाढीनंतर सेनानींच्या डोळ्यांत आनंदाश्रू, टाळ्यांच्या गजरात व्यक्त केली कृतज्ञता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here