मूल:- उमा नदीजवळ आज दुपारी २ वाजताच्या सुमारास दुचाकीस्वार गंभीर अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेल्या आढळला. प्रवीण लक्ष्मण गोहणे ( ४२) GS -३ एसीसी कॉलनी सिमेंट नगर घुगुस, उसगाव, चंद्रपूर येथील असल्याची माहिती जखमीच्या आधार कार्ड वरून मिळाली असून, मुल येथिल सामाजिक कार्यकर्ते नरसिंग गणवेनवार मूल, संदीप मोहबे , नरसिंग गणवेनवार मारोडा , मनोज शेरकी यांनी जखमीला उपजिल्हा रुग्णालय मुल येथे दाखल केले आहे. जखमीला कोणी ओळखत असल्यास या 88880 42889 क्रमांकावर संपर्क करा.





