चिचाळा ग्रामसभेचा ऐतिहासिक निर्णय – तंटामुक्ती समिती स्थापन, गाव एकतेच्या दिशेने मोठी झेप

0
211

चिचाळा (ता. मूल, जि. चंद्रपूर) – चिचाळा गावाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. ग्रामपंचायत चिचाळा ग्रामसभेच्या वतीने गावातील ऐक्य, सलोखा आणि विकासाच्या दिशेने मोठा पाऊल टाकत तंटामुक्ती समिती स्थापन करण्यात आली.

गावात छोटे-मोठे वाद, तंटे आणि मतभेद कायमचे मिटवून विकासाकडे वाटचाल करण्याचा निर्धार ग्रामसभेने केला आहे. अध्यक्ष म्हणून संजयजी गेडाम यांची निवड झाली असून सदस्य म्हणून प्रविण बोबाटे, सूरज टिकले, मनोज लेनगुरे, सौराज ईटकवार, अमोल बोबाटे, वैभव मोहुर्ले यांच्यासह इतर मान्यवर ग्रामस्थांचा समावेश आहे.

अध्यक्ष संजयजी गेडाम यांनी ठाम शब्दात सांगितले की, “गावातील तंटे संपवून, सलोखा आणि विकासाचा मार्ग खुला करण्यासाठी ही समिती एक क्षणही मागे हटणार नाही. प्रत्येक प्रकरण संवादाने आणि न्यायाने सोडवले जाईल.”

हा निर्णय ग्रामसभेच्या एकतेचे प्रतीक ठरला असून, चिचाळा गाव आता “तंटामुक्त – विकासमुखी” या दिशेने वाटचाल करत असल्याचे ग्रामस्थांनी समाधानाने व्यक्त केले.

Previous article15 ऑगस्ट ला सोमनाथ धबधबा पर्यटकांनसाठी बंद
Next articleसंविधान रक्षणासाठी मत चोरीची चौकशी करण्यासाठी मूल काँग्रेसच्या वतीने निवडणूक आयोगाला निवेदन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here