मूल, प्रतिनिधी
उन्हाळ्याच्या तीव्र झळा आणि पाणीटंचाईमुळे मूल शहरातील नागरिकांचे हाल होत असताना, साईकृपा कन्स्ट्रकशन, मूल आणि गुंजन कन्स्ट्रक्शन, मूल – संचालक श्री. दीपक प्रभाकरराव बोर्डावार* यांनी माणुसकीचा आदर्श घालून दिला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता श्री. बोर्डावार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शहरातील विविध भागांमध्ये मोफत टँकरद्वारे जलसेवा सुरू ठेवली आहे. पाणी ही जीवनावश्यक गरज असून पाण्याअभावी सामान्य कुटुंबांचे जीवन विस्कळीत होत असताना, ही सेवा म्हणजे गरजू नागरिकांसाठी मोठा आधार ठरत आहे.
या मोफत पाणीपुरवठ्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. घरगुती वापरासाठी वेळेवर पाणी मिळत असल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे.
समाजातील गरजूंच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहणाऱ्या साईकृपा व गुंजन कन्स्ट्रक्शनच्या या कार्यामुळे परिसरात सामाजिक एकात्मता आणि सेवाभाव अधिक दृढ झाला आहे. या उपक्रमाबद्दल परिसरातील नागरिकांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. “संकटाच्या काळात मदतीचा हात पुढे करणारे दीपक बोर्डावार यांचे कार्य खरोखर प्रेरणादायी आहे. जल ही जीवन आहे, हे त्यांनी प्रत्यक्षात आणून दाखवले आहे,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. भविष्यातही अशीच समाजोपयोगी सेवा सुरू राहो, अशी अपेक्षा नागरिकांनी केली आहे.





