मूलमध्ये बनावट सुगंधित तंबाखूचा कारखाना उघड; 1.54 लाखांचा मुद्देमाल जप्त, एक अटक

0
443

मूल, प्रतिनिधी

महाराष्ट्रात बंदी असलेल्या सुगंधित तंबाखू आणि पानमसाल्याच्या निर्मितीवर मूल पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर आणि पोलीस स्टेशन मूलच्या पथकाने 16/06/2026 रोजी मूल शहरातील वॉर्ड नं. 14 मधील एका घरावर छापा टाकून 1 लाख 54 हजार 455 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गुप्त माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली. आरोपी मोहम्मद तोहिद शेख, वय 21 वर्षे, रा. वॉर्ड नं. 14, ता. मूल, जि. चंद्रपूर याच्या घरात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखू व पानमसाला बनवून विक्रीसाठी ठेवण्यात आला होता.

या प्रकरणी आरोपी मोहम्मद तोहिद शेख याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस स्टेशन मूल करीत आहे. जप्त मुद्देमाल अन्न व औषध प्रशासन चंद्रपूर यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. अमोल कावोरे, पो.नि. विजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि मूल पोलीस स्टेशनच्या पथकाने केली.

Previous articleमूल पोलिसांची मोठी कारवाई; 8 हजार 830 रुपयांचा बोगस कापूस बियाणे साठा जप्त

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here