पाणी नाही तर चैन नाही! मूल शहराची तहान भागवायला भाजपा उतरली रस्त्यावर 💪 घागर घेऊन नगर परिषदेला धडक देणार

0
246

मूल शहरात वारंवार होणारा अनियमित पाणीपुरवठा, नागरिकांना भेडसावणारी पाणीटंचाई आणि नगर परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी, मूल शहर* यांच्या वतीने “घागर मोर्चा” आयोजित करण्यात आला आहे.

हा मोर्चा बुधवार, दिनांक 17 जून 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता रामलीला भवन, मूल येथून सुरू होऊन *नगर परिषद कार्यालय, मूल येथे धडकणार आहे.

मूल शहरातील प्रत्येक नागरिकाला नियमित व पुरेसा पाणीपुरवठा मिळावा, पाणी समस्येवर तात्काळ तोडगा निघावा आणि जनतेच्या मूलभूत हक्कासाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे.

भारतीय जनता पार्टी, मूल शहर यांच्या वतीने सर्व नागरिक, माता-भगिनी, युवक आणि कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा घागर मोर्चा यशस्वी करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Previous articleमहावितरण कार्यालयात ग्राहकांची हेळसांड? ‘लिंक फेल’ कारण, कर्मचारी मोबाईलवर व्यस्त असल्याचा आरोप 
Next articleपाणीटंचाईच्या संकटात मूलकरांसाठी देवदूत; साईकृपा-गुंजन कन्स्ट्रक्शनची मोफत जलसेवा सुरू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here