Thursday, September 17, 2026
Home मूल बैल पोळा व तान्हा पोळा निमित्ताने ग्रामपंचायत बेंबाळचा अभिनव उपक्रम गावातील...

बैल पोळा व तान्हा पोळा निमित्ताने ग्रामपंचायत बेंबाळचा अभिनव उपक्रम गावातील शेतकरी व तान्ह्या बाळगोपाळांवर बक्षिसांचा वर्षाव

0
147
  1. बेंबाळ, ता. मुल : दरवर्षीच्या परंपरेनुसार ग्रामपंचायत बेंबाळ कार्यालयामार्फत शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण असलेला बैल पोळा व तान्हा पोळा मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

यावेळी ग्रामपंचायत बेंबाळच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बैल पोळा स्पर्धेत शेतकऱ्यांसाठी आकर्षक बक्षिसांची योजना करण्यात आली होती. उत्कृष्ट सजावट केलेल्या बैलांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध क्रमांकाची बक्षिसे देण्यात आली. तसेच सहभागी प्रत्येक शेतकऱ्यास एक वृक्ष व एक स्टील टिफिन डबा भेट म्हणून देण्यात आला. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला. नोंदणी झालेल्या शेतकऱ्याला लकी ड्रॉ मार्फत १० पाण्याची कॅन, १० चार्जिंग पंप, व प्रथम विजेत्याला फवारणी पेट्रोल पंप देण्यात आला.

तसेच दुसऱ्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या तान्हा पोळा स्पर्धेत गावातील तान्ह्या बाळगोपाळांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. बालकांसाठी सायकल, आकर्षक खेळणी व शैक्षणिक साहित्य अशा विविध बक्षिसांचे वितरण करण्यात आले. सहभागी सर्व बालकांना देखील प्रोत्साहनपर भेटवस्तू म्हणून एक झाड व एक नोटपॅड देण्यात आला. लकी ड्रॉ मार्फत १० स्टडी टेबल,१५ लहान सायकल व प्रथम बक्षिस रेंजर सायकल देण्यात आली. संतोष सिंह रावत मित्र परिवाराकडून ८ लहान सायकल देण्यात आली.

या कार्यक्रमामुळे बेंबाळ गावात पोळा सणाचा उत्साह द्विगुणित झाला असून शेतकरी, महिला, युवक व बालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला.

ग्रामपंचायत बेंबाळच्या या अभिनव उपक्रमाचे गावकऱ्यांकडून सर्वत्र कौतुक होत असून, शेतकरी बांधवांना प्रोत्साहन देतानाच बालकांच्या कलागुणांना व सहभागाला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा हा स्तुत्य प्रयत्न असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

“वृक्षारोपण हाच खरा धर्म, वसुंधरेचे रक्षण हेच आपले कर्म” हा पर्यावरणपूरक संदेश देत ग्रामपंचायत बेंबाळने पोळा सणाला सामाजिक व पर्यावरणीय उपक्रमाची जोड दिली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, कर्मचारी व गावातील नागरिकांनी विशेष सहकार्य केले. यावेळी ग्रामपंचायत बेंबाळच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे व सहभागी नागरिकांचे आभार मानण्यात आले.

 

Previous articleदरार मंडळ तर्फे तान्हा पोळा उत्सवाचा थाट; रिल्सस्टार साहिल कडक आणि एंकर रजनी पॉल यांची प्रमुख उपस्थिती
Next articleसुभाष उच्च प्राथमिक शाळा, मूल येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा; नंदीबैल सजावट व वेशभूषा स्पर्धेत ४८ विद्यार्थी रंगले!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

© All Rights Reserved