मूल (प्रतिनिधी):
स्थानिक सिध्दीविनायक मंदिर येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचा परिसरातील अनेक नागरिकांनी लाभ घेतला.
सदर शिबीराचे उद्घाटन सिध्दीविनायक मंदिर समितीचे अध्यक्ष श्री. महेश हरडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून प्रभागाचे नगरसेवक विवेक मुत्यलवार, नलिनी आडपवार आणि नगरपरिषदेचे डांगे सर उपस्थित होते.
तसेच या कार्यक्रमाला प्रवीण राजा यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर व आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या शिबीरात आलेल्या नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी करून त्यांना योग्य वैद्यकीय सल्ला व औषधोपचार पुरवण्यात आले. मंदिर समिती व लोकप्रतिनिधींच्या या संयुक्त उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून विशेष कौतुक होत आहे.





