Thursday, September 17, 2026
Home मूल सुभाष उच्च प्राथमिक शाळा, मूल येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा; नंदीबैल सजावट...

सुभाष उच्च प्राथमिक शाळा, मूल येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा; नंदीबैल सजावट व वेशभूषा स्पर्धेत ४८ विद्यार्थी रंगले!

0
75

मूल प्रतिनिधी:

स्थानिक सुभाष उच्च प्राथमिक शाळा, मूल येथे तान्हा पोळ्याचे औचित्य साधून नंदीबैल सजावट व वेशभूषा स्पर्धेचे दिमाखदार आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पूर्व प्राथमिक ते इयत्ता ८ वी पर्यंतच्या तब्बल ४८ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

या स्पर्धेचे परीक्षण पत्रकार कुमुदिनी भोयर आणि वैशाली कोकुलवार यांनी केले. त्यांनी नंदी सजावट आणि वेशभूषा या दोन्ही प्रकारांचे परीक्षण करून विजेत्यांची निवड केली.

कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी नरसिंगभाऊ गणवेनवार हे होते. प्रमुख अतिथी म्हणून राहुल प्रेमलवार, ऋतिक गोयल, डिंपी गोयल, डेव्हिड खोब्रागडे, मारोतराव पुल्लावार, गणेश मांडवकर, उषाताई शेंडे, लीनाताई बद्देलवार, मिलिंद खोब्रागडे, विजय वैरागडवार, मोगरकर सर, अविनाश जगताप, सुवर्णा पिपरे, इंदू मडावी, गायत्री मडावी, उषा थोरात, नरेंद्र कामडे, अमोल बोबाटे, गीता अमदुर्तीवार, कल्याणी मांदाडे, माधुरी चिंचोलकर, चावके, मुनघाटे, इटनकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

पत्रकार दीपक देशपांडे, नासीर खान, दुर्योधन घोंगडे, आनंदराव कुडे, दत्तू वारानसीवार, धर्मा सुत्रपवार यांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही स्पर्धा तीन गटांत घेण्यात आली. प्रत्येक गटातील प्रथम तीन विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले, तसेच सर्व ४८ विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली.सूत्रसंचालन रिना मसराम यांनी केले, तर आभार राजू गेडाम यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल मुंगमोडे, योगेश पुल्लकवार, बंडू अल्लीवार, अजय राऊत, संकेत जाधव, निशा जगताप, फलके, मोकाशी, पोहणे यांनी परिश्रम घेतले.

 

Previous articleबैल पोळा व तान्हा पोळा निमित्ताने ग्रामपंचायत बेंबाळचा अभिनव उपक्रम गावातील शेतकरी व तान्ह्या बाळगोपाळांवर बक्षिसांचा वर्षाव
Next articleशूरवी महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी धनश्री दंडिकवारचे घवघवीत यश; गोंडवाना विद्यापीठात चौथी मेरिट, मूल तालुक्यात प्रथम 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

© All Rights Reserved