Thursday, September 17, 2026
Home मूल शूरवी महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी धनश्री दंडिकवारचे घवघवीत यश; गोंडवाना विद्यापीठात चौथी मेरिट,...

शूरवी महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी धनश्री दंडिकवारचे घवघवीत यश; गोंडवाना विद्यापीठात चौथी मेरिट, मूल तालुक्यात प्रथम 

0
31

मूल :

जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमांच्या बळावर येथील शूरवी महिला महाविद्यालयाची बी.ए. शाखेची विद्यार्थिनी *कु. धनश्री भोजराज दंडिकवार* हिने उल्लेखनीय यश संपादन करत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली अंतर्गत नुकत्याच जाहीर झालेल्या पदवी परीक्षेच्या (सत्र २०२३–२६) गुणवत्ता यादीत तिने मानवविज्ञान शाखेतून संपूर्ण *विद्यापीठात चौथा क्रमांक (४ थी मेरिट)* पटकावला आहे. विशेष म्हणजे, तिने *मूल तालुक्यात प्रथम क्रमांक* मिळवून तालुक्याच्या लौकिकात भर घातली आहे.

 

ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना योग्य वातावरण, दर्जेदार शिक्षण आणि आत्मविश्वास लाभल्यास त्या विद्यापीठ स्तरावरही अव्वल यश मिळवू शकतात, हे धनश्रीने आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे. आपल्या या यशाचे श्रेय धनश्रीने आई-वडील, महाविद्यालयाच्या प्राचार्या तसेच सर्व प्राध्यापकवृंदाला दिले आहे.

धनश्रीच्या या यशाबद्दल श्री माता कन्यका सेवा संस्थेचे अध्यक्ष *श्री. कापर्ती सर व सचिव श्री. सुरावार सर यांनी तिचे विशेष कौतुक करत अभिनंदन केले.

“शूरवीची गुणवंत लेक, शूरवीचा अभिमान!” अशा गौरवशाली शब्दांत महाविद्यालयाच्या कार्यकारी प्राचार्या *कु. हर्षा खरासे मॅडम* यांनी भावना व्यक्त करत धनश्रीचे अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिच्या पाठीवर कौतुकाची थाप देत पुढील उज्ज्वल शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Previous articleसुभाष उच्च प्राथमिक शाळा, मूल येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा; नंदीबैल सजावट व वेशभूषा स्पर्धेत ४८ विद्यार्थी रंगले!
Next article‘गाव बदलाचा साक्षीदार’ आणि ‘अ डेथ इन द फॉरेस्ट’ चळवळीचे जिवंत दस्तऐवज लोकसत्ताचे निवासी संपादक देवेंद्र गावंडे यांचे प्रतिपादन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

© All Rights Reserved