मूल (चंद्रपूर), दि. 11 – शहरातील महात्मा ज्योतिबा फुले चौक, पोस्ट ऑफिस जवळ शुक्रवार दि. 11 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता दुसरा तान्हा पोळा उत्सव 2026 मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
या उत्सवात उत्कृष्ट नंदी आणि सजावटीसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. यामध्ये प्रथम बक्षीस LED टीव्ही, रेंजर सायकल, स्टडी टेबल, मिक्सर, बेबी सायकल, कुकर, फायबर चेअर, स्कूल बॅग अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून टीफीन बॉक्स देण्यात येणार आहे. हे बक्षीस बांधकाम सभापती न.प. मूल श्री. प्रशांत समर्थ यांच्याकडून तर बिस्कीट पॅकेट श्री. मनिष मोहबेशी व चिप्स व कुरकुरे सिम डी मॉल सुपर मार्केटचे जैकी भाई दासानी यांच्याकडून देण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे प्रसिद्ध *रिल्सस्टार साहिल कडक (त.. का बे पोटेहो फेम) आणि एंकर रजनी पॉल (नमस्कार मूलकर फेम) हे असणार आहेत.
उत्सवाला आर्थिक सहकार्य दिपक युणावार, संतोष ठाकूरवार, स्वप्नील श्रीरामे, प्रमोद महाडोरे, बदलम करपे, रजित येनगटीवार, प्रदुम्न कंदीकुंरवार, अब्बास मिस्त्री, लवनिश उधवाणी, अनिल समर्थ, आकाश इंगमवार यांनी केले आहे.
मूलकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.





