मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांची मेजवानी; युवाक्रांती बहुउद्देशीय संस्थेच्या पुढाकार

0
111

 

मूल : राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन मूल येथील युवाक्रांती बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने  रक्तदान शिबीराचे आयोजन 22 जुलै २०२५ उपजिल्हा रूग्णालय मूल येथे करण्यात आले आहे.

यासोबतच मूल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना नोटबुक आणि महापुरूषांच्या पुस्तकाचे वितरण व गरजु नागरिकांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात येणार आहे, सकाळी 8 वाजता मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात रूग्णाना फळाचे वाटप सुध्दा करण्यात येणार आहे. आयोजीत करण्यात आलेल्या विविध कार्यकमाला नागरीकांना मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन युवाक्रांती संघटनेचे संस्थापक निखील वाढई, अध्यक्ष प्रणीत पाल, कार्याध्यक्ष निहाल गेडाम यांनी केले आहे.

Previous articleशिवलिंग प्राणप्रतिष्ठा सोहळा ; श्री साई मित्र परिवारचे आयोजन 
Next articleचिचाळा गावात वयोवृद्ध, दिव्यांग व अशक्त नागरिकांसाठी घरपोच बँकिंग सेवा सुरू करण्याची मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here