रोहित कामडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिव्यांग सेलच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

0
186

चंद्रपूर (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिव्यांग सेलच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी रोहित प्रकाश कामडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक योगदानाची दखल घेत ही नियुक्ती करण्यात आली असून, नियुक्तीपत्र निताताई ढवाण (राज्य प्रमुख, दिव्यांग सेल महाराष्ट्र) यांनी अधिकृतपणे दिले.

पक्षाच्या संघटनात्मक बांधणीस हातभार लावत रोहित कामडे यांनी आतापर्यंत दिलेले योगदान लक्षात घेता त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पक्ष मजबूत करण्यासाठी ते आपले संपूर्ण कौशल्य, वेळ आणि ऊर्जा समर्पित करतील, असा विश्वास नियुक्ती पत्रात व्यक्त करण्यात आला आहे.

या प्रसंगी नितीन भटारकर (जिल्हाध्यक्ष), राजू कक्कड (शहर जिल्हाध्यक्ष), सुनील काळे (विधानसभा जिल्हाध्यक्ष), सुजित उपरे (विद्यार्थी जिल्हाध्यक्ष), पंकज ढेगारे (वैद्यकीय जिल्हाध्यक्ष), संजय सेजुल (कामगार जिल्हाध्यक्ष), अमर गोमासे (सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष) आदी मान्यवर उपस्थित होते.

रोहित कामडे हे मूळचे मूल तालुक्यातील असून, विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे. त्यांच्या या निवडीबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Previous articleवाढत्या मानव – वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण बैठक
Next articleनिःशुल्क मोतिबिंदु नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here