Thursday, September 17, 2026
Home मूल भारती राखडे यांच्या वाढदिवसानिमित्त मूल उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप

भारती राखडे यांच्या वाढदिवसानिमित्त मूल उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप

0
103

मूल (चंद्रपूर), -शिवसेना महिला जिल्हा प्रमुख, चंद्रपूर भारतीताई राखडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जोपासत मूल शहरातील उपजिल्हा रुग्णालयात भव्य फळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामुळे रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.

या कार्यक्रमांतर्गत रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सर्व आंतररुग्णांना संत्री, सफरचंद, केळी, मोसंबी यांसारखी पौष्टिक फळे वाटण्यात आली. रुग्णांना पोषण मिळावे आणि त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

या सेवाभावी उपक्रमाला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शितलताई वेलपुलवार, शालिनीताई खैरे, उर्मिला कोहळे, शुभम समर्थ, संजय खैरे, संजय मारतवार, टिंकू दुधे यांच्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी रुग्णांशी आपुलकीने संवाद साधला, त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

केवळ राजकारण न करता सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या शिवसेनेने या उपक्रमातून समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. वाढदिवस साजरा करताना अनावश्यक खर्च टाळून गरजू रुग्णांसाठी फळ वाटप करणे हे खरोखरच कौतुकास्पद असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.रुग्णालय प्रशासनाने देखील या उपक्रमाचे स्वागत केले असून अशा उपक्रमांमुळे रुग्णांना मानसिक आधार मिळतो असे सांगितले.

कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना – मूल शाखेच्या वतीने करण्यात आले होते व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी परिश्रम घेतले.

Previous articleमूलच्या बंटी मिश्राची हत्या; वाघोली शिवारात सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली
Next article‘स्मृतिगंध’मधून उमटला विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचा सुगंध”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

© All Rights Reserved