Thursday, September 17, 2026
Home मूल भारतीय जनता पक्षाच्या वतीने बैलपोळ्यानिमित्त शेतकऱ्यांचा सन्मान गुजरी चौकातील पारंपरिक पोळा...

भारतीय जनता पक्षाच्या वतीने बैलपोळ्यानिमित्त शेतकऱ्यांचा सन्मान गुजरी चौकातील पारंपरिक पोळा उत्साहात साजरा

0
200

मुल : शहरातील अनेक वर्षांची परंपरा असलेला बैलपोळा यंदाही गुजरी चौक येथे मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांनी आपल्या सर्जा-राजाला आकर्षक पद्धतीने सजवून आणत पोळ्याचा सण जल्लोषात साजरा केला.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने गुजरी चौक येथे उपस्थित शेतकरी बांधवांचे औक्षण करून, दुपट्टा देऊन तसेच बैलांची विधिवत पूजा करून सन्मान करण्यात आला. शेतकऱ्यांच्या जीवनात बैलांचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करत त्यांच्या कष्टाला आणि कृषी संस्कृतीला अभिवादन करण्यात आले.

यावेळी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या शेतकरी बांधवांनी ‘झुलवे’च्या गजरात पोळ्याचा आनंद लुटला. संपूर्ण गुजरी चौकात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष प्रविणजी मोहूर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष उषा शेंडे, भाजपा महिला मोर्चा जिल्हा कार्यक्रम प्रमुख प्रा. डॉ. सौ. किरण कापगते-बोरकर, नगरसेविका सौ. अश्विनी निकोडे, युवा मोर्चा जिल्हा महामंत्री राकेश ठाकरे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष पंकज लाडवे, आदिवासी आघाडी प्रमुख रीना मसराम, महामंत्री जितेंद्र टिगुसले, सौ. आशा गुप्ता, रुपेश निकोडे, आनंद आक्केवार, गौतम जीवने, प्रविण मोहूर्ले, पूजा मोहूर्ले यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळा सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

Previous articleसाईबाबा मंदिर बाजार समिती मूल तर्फे शेतकऱ्यांना बैलपोळा भेट; प्रत्येक बैलजोडीधारकाला शेती अवजार भेट
Next articleदरार मंडळ तर्फे तान्हा पोळा उत्सवाचा थाट; रिल्सस्टार साहिल कडक आणि एंकर रजनी पॉल यांची प्रमुख उपस्थिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

© All Rights Reserved