Thursday, September 17, 2026
Home मूल साईबाबा मंदिर बाजार समिती मूल तर्फे शेतकऱ्यांना बैलपोळा भेट; प्रत्येक बैलजोडीधारकाला शेती...

साईबाबा मंदिर बाजार समिती मूल तर्फे शेतकऱ्यांना बैलपोळा भेट; प्रत्येक बैलजोडीधारकाला शेती अवजार भेट

0
114

मूल (चंद्रपूर), दि. १० – बैलपोळा सणाचे औचित्य साधून साईबाबा मंदिर बाजार समिती, मूल च्या वतीने आगळा-वेगळा उपक्रम राबविण्यात येणार आहे. येणाऱ्या प्रत्येक बैलजोडीधारक शेतकरी बांधवाला *शेती अवजार भेट* म्हणून देण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा सण असलेल्या बैलपोळा निमित्त शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी बाजार समितीने हा उपक्रम हाती घेतला आहे. शेतकरी हा बळीराजा असून बैल हा त्याचा सोबती आहे, त्याच्या सन्मानार्थ ही भेटवस्तू देण्यात येणार आहे.

तसेच बैलपोळा निमित्त सर्व शेतकरी बांधवांना बाजार समितीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.या उपक्रमाचे शेतकरी बांधवांकडून स्वागत होत असून बाजार समितीच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Previous article‘स्मृतिगंध’मधून उमटला विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचा सुगंध”
Next articleभारतीय जनता पक्षाच्या वतीने बैलपोळ्यानिमित्त शेतकऱ्यांचा सन्मान गुजरी चौकातील पारंपरिक पोळा उत्साहात साजरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

© All Rights Reserved