मुल प्रभाग 10 पेटला! वाढत्या गुन्हेगारी विरोधात शेकडो नागरिक रस्त्यावर हात बॅनर, तोंडी एकच मागणी – “आम्हाला सुरक्षा द्या”

0
429

प्रतिनिधी:- कुमुदिनी भोयर

मूल, 14 जून 2026:प्रभाग 10 मधील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावर काल झालेल्या नागरिक आंदोलनाला आता लोकप्रतिनिधींचीही साथ मिळाली आहे.

नगरसेवक *राहुल प्रेमलवार* यांनी दिनांक 13/06/2026 रोजी मूल पोलीस निरीक्षकांना लेखी पत्र दिले आहे. या पत्रात त्यांनी वार्ड क्र. 17 सह प्रभाग 10 मध्ये अवैध दारूविक्री, गांजाविक्री आणि गुंडगिरी सारखे विधीबाह्य कृत्ये वाढल्याचा उल्लेख केला आहे.

पत्रात ठळकपणे नमूद करण्यात आलं आहे की, *10 जून 2026* रोजी आठवडी बाजारात अक्षय गोवर्धन नावाच्या व्यक्तीने मारोती मेश्राम यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे.

नगरसेवकांनी पोलिसांना रात्री 10 नंतर गस्त वाढवण्याची आणि अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई करण्याची विनंती केली आहे. या पत्राच्या प्रती जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि तहसीलदार यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.

काल नागरिकांनी रस्त्यावर उतरून आणि आज लोकप्रतिनिधींनी लेखी निवेदन देऊन प्रभाग 10 चा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. आता प्रशासन काय कारवाई करतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Previous articleमुलच्या शासकीय गोडाऊनमध्ये भरदिवसा लोखंडी रॉडने हल्ला ; जखमी मरणसुन्न अवस्थेत
Next articleवाढदिवस झाडांचा फळ रुग्णांची… प्रा किरणताई कापगते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here