वाढदिवस झाडांचा फळ रुग्णांची… प्रा किरणताई कापगते

0
157

 

मूल :- समाजसेवेचा आदर्श घालून देणाऱ्या प्राध्यापक डॉ. किरणताई कापगाते यांचा वाढदिवस काल अत्यंत सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

डॉ. किरणताई यांच्या वाढदिवसानिमित्त मूल येथील रुग्णालयात दाखल रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. “जन्मदिवस साजरा करतानाच दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणता आलं पाहिजे” या त्यांच्या विचाराला अनुसरून हा उपक्रम घेण्यात आला. रुग्णांनीही डॉ. ताईंना भरभरून आशीर्वाद दिले.

या बरोबर पर्यावरण रक्षणाचा संदेश देत वृक्षारोपण कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले. प्रत्येक झाड म्हणजे एक जीवन, असा संदेश यानिमित्ताने देण्यात आला.

दुपारी दीनदयाल उपाध्याय इको पार्क परिसरात नागरिकांसाठी नाश्त्याचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो नागरिकांनी याचा लाभ घेतला.

डॉ. किरणताई कापगते या केवळ प्राध्यापक नसून विद्यार्थी आणि समाजासाठी प्रेरणास्थान आहेत. वाढदिवशी फटाके न फोडता माणुसकीचा दिवा लावणाऱ्या डॉ. ताईंना वाढदिवसाच्या सर्वांनी शुभेच्छा दिल्या.

Previous articleमुल प्रभाग 10 पेटला! वाढत्या गुन्हेगारी विरोधात शेकडो नागरिक रस्त्यावर हात बॅनर, तोंडी एकच मागणी – “आम्हाला सुरक्षा द्या”
Next articleमूल प्रभाग क्र.10 मध्ये भीतीचे सावट; हल्ल्याप्रकरणातील जखमी नागरिकाचा उपचारादरम्यान दुर्दैवी अंत, नागरिकांत चिंतेचे वातावरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here